नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर केली. गडकरी यांना लोकसभा निवडणुकीत ‘काटे की टक्कर’ देण्यासाठी महाविकास आघाडीने काँग्रेसचे विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.त्यामुळे सर्वांना चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचे सोमवारी नागपूरला आगमन झाले. काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांना राजकारणातला दांडगा अनुभव आहे.
त्यामुळे गडकरी विरुद्ध लढत असलेल्या ठाकरे यांना शरद पवार यांचा कानमंत्र महत्वाचा ठरेल. विकास ठाकरे आणि शरद पवारांनी सुमारे तासभर चर्चा केली.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील शरद पवार यांच्यासोबत होते.
दरम्यान वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमर काळे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहे.आज काळे यांनी अर्ज भरला. त्यावेळी शरद पवार उपस्थितीत होते. वर्ध्याकडे रवाना होण्यापूर्वी विकास ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली.