नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिल्लीतजाहीरनामा प्रसिध्द केला आहे.काँग्रेस पक्षाने दिल्लीतील AICC मुख्यालयात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
‘GYAN’ संकल्पनेवर काँग्रेसचा जाहीरनामा –
G- गरीब, Y-युवा, A-अन्नदाता, N- नारी ही काँग्रेसची संकल्पना आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पाच महत्त्वाच्या घटकांचा समावेश केला.
त्यात युवा न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, कामगार न्याय आणि समता न्याय यांचा उल्लेख आहे. आम्ही एकत्रितपणे या अन्याय काळातील अंधार दूर करू आणि भारतातील लोकांसाठी समृद्ध, न्यायाने परिपूर्ण आणि सुसंवादी भविष्याचा मार्ग प्रशस्त करू,असे काँग्रेसचे म्हणणे आहे. पक्षाकडून शेतकरी, मजूर, युवा, रोजगार, महिला यांच्याबाबत काही आश्वासने देण्यात आली आहेत.
2024 मध्ये केंद्रात आमचे सरकार आल्यास सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी 1 लाख रुपयांची मदत करेल.त्याशिवाय शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे आश्वासनही या जाहीरनाम्याचा माध्यमातून देण्यात आले आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आज पक्ष कार्यालयातून प्रसिध्द केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘न्याय पत्र’ असे नाव दिले. यामध्ये काँग्रेस पक्षानेही देशभर जातवर आधारित जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे.