Published On : Wed, Feb 14th, 2024

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी !

Advertisement

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याकरिता सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोनिया गांधी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली. तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांनाही उमेदवारी देण्यात आली.

एकीकडे लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे. तर आज काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ.अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंगवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

Advertisement

चंद्रकांत हंडोरे हे १९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पुढे १९९२-९३मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून मुंबईचे महापौरपदही मिळविले. पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.