– कांदा निर्यात बंदी मागे घ्या – सुरेश भोयर
कामठी :-अलीकडे शेतकरी डबघाईस आला आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार शेतकरी विरुद्ध धोरण अवलंबून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे त्यातही कांदा निर्यातबंदी करून देशातील शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याने केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी या धोरणाविरुद्ध कांग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत असून दरम्यान कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणो कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या पाश्वरभूमीवर सर्वत्र लागू असलेल्या लोकडॉउन च्या स्थितीत देशातील शेतकऱ्यांनी कष्टाने शेती करून उत्पादन सुरू ठेवले .शेती व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा ठरला असला तरी केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण अवलंबून शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे .
केंद्र सरकारने अचानक शेतकरी विरोधी धोरण अवलंबुन कांदा निर्यातीवर बंदी आणली या कांदा निर्यात बंदी मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे तेव्हा ही कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली आहे.
– संदीप कांबळे,कामठी