Published On : Sat, Mar 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा- राहुल गांधींचा आरोप

Advertisement

ठाणे: नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलोक्टोरल बाँडच्या माध्यामातून जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकटे चालवतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते आणि दुसरीकडे कोविडची लस बनवाणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून मोदींना देत होती असा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला, ते पुढे म्हणाले की, इलोक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठो खंडणी वसुली रॅकेट आहे. या रॅकेटमधून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात.याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास अमित शाह ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून त्यांचा आवाज दडपून टाकतात. शिवसेना पक्ष फोडून जे आमदार बाहेर पडले ते काय असेच मोफत गेले का ? महाराष्ट्र, गोवा राज्यातील सरकार पाडण्यात याच इलोक्टोरल बाँडमधून कमावलेल्या खंडणीच्या पैशाचा वापर केला गेला.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले पण या सोहळ्याला आदिवासी, दलित, मागास, गरिब समाजातील कोणालाही बोलावले नाही.

नरेंद्र मोदी, मोहन भागवत, फिल्मस्टार्स, क्रिकेटपटू, अंबानी, अदानी असे मोजक्या लोकांनाच निमंत्रित केले होते. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही, झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उग्घाटन सोहळ्याला बोलावले नाही. देशात ओबीसी, दलित, मागास, आदिवासी समाजाची ८८ टक्के लोकसंख्या आहे पण प्रशासनासह महत्वाच्या क्षेत्रात त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

Advertisement
Advertisement