Published On : Wed, Dec 27th, 2023

काँग्रेसची महारॅली कार्यकर्त्यांची ताकद वाढवणारी ; विजय वडेट्टीवार यांचा विश्वास

Advertisement

नागपूर : काँग्रेस पक्षाचा स्थापन दिवस २८ डिसेंबर रोजी नागपूरच्या ऐतिहासिक भूमीत महारॅलीने साजरा केला जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसचा १३८ वा वर्धापन दिवस असून नागपूरमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.या अनुषंगाने होणारी काँग्रेसची महारॅली कार्यकर्त्यांची ताकद वाढवणारी असणार, असे विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

सत्ताधाऱ्यांकडून संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी ‘है तयार हम’ रॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरणार, असे वडेट्टीवार म्हणाले.

Advertisement

दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी व लाखो काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. ज्या मैदानात हा मेळावा होत आहे त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ अशी या महारॅलीची संकल्पना असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.