नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागातर्फे पूर्व व पश्चिम विदर्भातील पदाधिका-यांसाठी रविवारी, 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता नागपूर येथील गोरेपेठ परिसरातील वनामती सभागृहात ‘लोकशाही वाचवा – देश वाचवा’ सत्याग्रह शिबिर व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता आलोक शर्मा, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, प्रवक्ता अतुल लोंढे, महाराष्ट्र सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार व महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी नितीन अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी सोशल मीडिया विभागातर्फे पदाधिका-यांना या कार्यशाळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच निवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्तिपत्रे प्रदान केली जातील.