Published On : Fri, Jun 21st, 2024

नागपुरात काँग्रेसचे राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन; कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट

Advertisement

नागपूर : राज्य सरकारच्या शेतकरी,नीट परीक्षेतील घोळ,गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज राज्यव्यापी चिखलफेक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान आंदोलन चिघळल्याने पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापट पाहायला मिळाली.

पोलीस प्रशासनाचा आमच्या प्रति आक्रमक पवित्रा पाहता ते पक्षपाती असून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केला.

Advertisement

राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसने आज राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन केले. नागपुरातील व्हॅरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार विकास ठाकरे, प्रशांत धवड, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागपूर शहर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेद्र मुळक उपस्थित होते.