Advertisement
कर्नाटका– कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलनुसार काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तर, भाजपा आणि जनता दल पिछाडीवर आहेत. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
देशात परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताच सरकार स्थापन करेल. भाजपा लोकशाही न मानणारा पक्ष आहे. त्यामुळे यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिल्याचे पटोले म्हणाले.
कर्नाटक निवडणुकीचा सर्व प्रचार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधींच्या नेतृत्वाला देशात मान्यता सुरु झाली आहे. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होती, असेही ते म्हणाले.