नागपूर :लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 543 लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर केला आहे. यात भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला 99 जागा मिळवता आल्या आहेत.त्यामुळे आम्हीही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे.आमच्याकडे सर्व फॉर्म्युले तयार आहेत. सगळे खासदारांना दिल्लीत बोलावले आहे.
आज खासदार दिल्लीत येणार असून सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील सर्व खासदारांशी संपर्क झाला आहे. मी उद्या दिल्लीत जाणार आहे. खासदारांना दिल्लीत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत आम्ही सरकार बनवणार आहोत. आम्ही प्लान तयार केला आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
आज माझा वाढदिवस आहे. राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करतो. आम्हाला विजय मिळवून मोठं गिफ्ट दिले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही विदर्भातील 62 पैकी 50 जागा जिंकणार आहोत, असा दावा त्यांनी केला आहे.राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले.दुष्काळाचं चित्र भयावह आहे. या सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले.