नागपूर : शहारात हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सर्वसामान्य नागरिक शेतकरी, बेरोजगार युवक आणि विद्यार्थांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने विधान भवनावर “हल्ला बोल’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
नागपुरातील अंजुमन कॉम्प्लेक्स येथून हा मोर्चा विधानभवनावर येणार होता, मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग करून हा मोर्चा रोखला.
मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली, त्यानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यामुळे परीसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी नाना पटोले यांच्यासह सुमारे 60 ते 70 काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, तरुणांना न्यान मिळवून देणार. फडणवीस सरकारचे हे पाप आहे. या राज्यातील तरुण आणि तरुणींचे बेरोजगारीचे प्रश्न आम्ही सभागृहात आणि रस्त्यावर मांडणार आहे.
सरकार महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी काहीही करत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.