नागपूर : तरुण -तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध असल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही,असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिले.
पीडित तरुणीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. आरोपी व पीडितेची फेसबुकवरून मैत्री झाली. दोघांचे प्रेमात रूपांतर झाले. कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचे लग्न जुळले. मात्र काही कारणास्तव ते तुटले. यानंतर तरुणीने आरोपी तरुणीवर बलात्कारचा आरोप लावला. याप्रकरणी पीडित तरुणीने न्यायालयात धाव घेतली. न्यालयाने हे आरोप चुकीचे ठरविले आहे.
तरुणाविरुद्धचा गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच, बलात्कार आणि सहतीने शारीरिक संबंध ठेवणे यात बराच फरक असल्याचेही न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. अशा प्रकरणात खोटे बोलून किंवा फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित झालेत का? हे तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते. जर आरोपीचे उद्दिष्ट फक्त संबंध ठेवणे असेल आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून फसवले असेल तर तो बलात्कार समजला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र जर ते सिद्ध झाले नाही जर लग्नाचा शब्द देऊन भविष्यात काही कारणास्तव आरोपीने लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार मानला जाणार नाह, असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणात याचिकाकतर्फे ॲड. राजेश नायक यांनी बाजू मांडली.