Advertisement
नागपूर: भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेमध्ये दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करणयात येतो. त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा व झोन कार्यालयामध्ये संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून नागपूर महानगरपालेच्या सर्व शाळांमध्ये व झोन कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच शाळा व झोन परिसरात संविधान रॅली, निबंध स्पर्धा, संविधान लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करून मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात संविधान दिवस साजरा करण्यात आला.