Published On : Thu, Jul 21st, 2022
By Nagpur Today Nagpur News

वराडा बस स्टाप येथे चारपदरी महामार्गावर अंडर ब्रिज बनवुन द्या. – सरपंचा विद्या चिखले

सर्व्हीस रोडवर होणा-या अपघात थांबविण्या चे उपाय योजना करण्यात याव्या.

कन्हान : – ग्राम पंचायत वराडा व्दारे नागरिकांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय चारपदरी महामार्गा च्या वराडा बस स्टाप वर महामार्ग जिव मुठीत घेऊन पायदळ पार करावा लागत असुन अपघात वाढत आहे. तसेच बस स्टाप च्या जवळपास शाळा व पेट्रोल पंप असल्याने सर्व्हीस रोडच्या एकाच बाजुने वाहतुकीच्या वर्दळीने वाहनाचे अपघात होऊन निर्दोष लोकांचा मुत्यु किंवा अंपगत्वास बळी पडत असल्याने अपघाताचे नियंत्रणा करिता राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर अंडर ब्रिज त्वरि त बनविण्याची मागणी ग्रा प वराडा सरपंचा विद्याताई चिखले हयानी नागरिका व्दारे संबधित अधिका-याना निवेदन देऊन केली आहे.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र ४४ वरील वराडा बस स्टापवरून ये-जा करण्यास नाग रिकाना महामार्ग जीव मुठीत घेऊन पायदळ पार करा वा लागत असल्याने अपघात वाढत असुन मोठया अप घाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. बस स्टाप जवळ वराडा रोडवर माध्यमिक शाळा तसेच सर्व्हीस रोड लगत पेट्रोल पंप असुन सर्व्हीस रोडच्या एकाच बाजुने येणा-या जाणा-या वाहतुकीच्या वर्दळीने वाहना चे अपघात होऊन निर्दोष लोकांचा मुत्यु किंवा अंपग त्वास बळी पडत असल्याने अपघात कमी करून नियं त्रित करण्यात यावे.

तसेच या परिसरातील सर्व्हीस रोड वरील दोन पुलाचे गड्डे दिसत नसल्याने कित्येक वाहन चालकांना या गड्डयात वाहनास पडुन अपघात होत आहे. वराडा बस स्टाप च्या दोन्ही कडे एक एक किमी अंतरावर चारपदरी महामार्गावर दिवसे दिवस अपघात वाढुन कित्येक निर्दोष लोकांना प्राण गमवावे लागले तर कित्येकाना अंपगत्वाचे बळी पडावे लागले आहे. चारपदरी महामार्ग निर्माण काळातच येथे अंडर ब्रिज बनविण्यात आला असता तर कित्येक लोकांना अपघातात जीव गमवावा लागला नसता.

येथे अपघा ताचे प्रमाण वाढत असल्याने हे अपघात थांबविण्याचा योग्य उपाय म्हणुन वराडा बस स्टापवर अंडर ब्रिज त्वरित बनविण्यात यावा. या विषयी वारंवार मागणी करून सुध्दा दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आता जर पंधरा दिवसात ठोस उपाय योजना केल्या नाही तर वराडा बस स्टाप चारपदरी महामार्गावर नागरिकांव्दारे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तेव्हा उदभव ण्या-या प्रकारास संबधित प्रशासन व अधिकारी यांची सर्वश्री जवाबदार राहील. या विषयी मा प्रकल्प अधि कारी रा.रा.प्रा.प.का.ई, नागपुर यांना निवेदन व मा. जिल्हाधिकारी, नागपुर, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामिण आणि प्रबंधक ओरियंटल टोल प्लाझा, कांद्री हयाना प्रतिलिपी देऊन अंडर ब्रिज बनविण्याची मागणी करण्यात. शिष्टमंडळात ग्रा प वराडा सरपंचा सौ विद्याताई दिलीप चिखले, उपसरपंच सौ उषाताई सुरेश हेटे, ग्रा प सदस्य संगिता सोनटक्के, वैशाली नाकतोडे, सिमाताई शेळकी, संजय टाले, क्रिष्णा तेलंगे, चंद्रकला घाटोळे, रूपाली वन्हारकर, उषा घाटोळे, सरिता चिखले, कल्पना घाटोळे, कपिल टाले आदी प्रामुखाने उपस्थित होते.

Advertisement