Published On : Fri, Mar 5th, 2021

कॉंग्रेस नगर मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य ९०% पूर्ण

– रेल्वे मधून उतरताच मेट्रो होणार उपलब्ध,अजनी रेल्वे स्टेशन ; काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन राहणार संलग्न


नागपूर – महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशनचे निर्माण कार्य जलद गतीने पूर्ण करीत असून ऑरेंज लाईन मार्गिकेवरील काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य देखील पुर्णत्वाकडे अग्रेसर आहे. काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनचे ९०% कार्य पूर्ण झाले असून सदर मेट्रो स्टेशन प्रवासी वाहतुकीकरीता सुरु झाल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा फायदा होणार. मुख्य म्हणजे भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना अजनी रेल्वे स्टेशन येथे उतरताच मेट्रो ट्रेनने प्रवास करता येईल.

महा मेट्रोने अजनी रेल्वे स्टेशनच्या पहिल्या फ्लॅटफॉर्म येथून मेट्रो स्टेशनला जोडले आहे.ज्यामुळे नागरिकांना सहज पणे मेट्रो स्टेशन परिसरात पोहचता येईल तसेच मेट्रोचा उपयोग करून अजनी मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचून पुढील यात्रा करणे शक्य होईल. मुख्य म्हणजे अजनी रेल्वे स्टेशन येथून मोठ्या प्रमाणात नागरिक देशाच्या अन्य ठिकाणी जाण्याकरता या ठिकाणाहून प्रवास करीत असतात त्यामुळे रेल्वे प्रवाश्याना निश्चितच याचा फायदा होईल. या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या शाळा, कॉलेज येथील विद्यार्थ्याना करिता देखील उपयुक्त ठरेल. स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शासकीय व निमशासकीय कार्यालय, मंदिर, हॉल असल्यामुळे या परिसरात नागरिकांची नेहमीच रहदारी असते सदर मेट्रो स्टेशन सुरु झाल्यावर प्रवाश्याना तसेच स्थानिक नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे .

Gold Rate
Friday 14 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अजनी रेल्वे स्टेशन येथून मेट्रो प्लॅटफार्म पर्यंत पोहोचण्याकरीता एस्केलेटर्सचा उपयोग:* काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफार्म पर्यंत पोहोचन्याकरिता महा मेट्रोने अजनी रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म क्र. १ येथून एस्केलेटर्सची व्यवस्था केली आहे. काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनची उभारणी ८१००. ०० वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आली असून, स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

मेट्रो स्टेशनची वैशिष्ट्ये: आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंट मध्ये अग्निशामक टॅंक, दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा,अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था,कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याकरता तरतूद, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, लहान मुलांच्या देखरेखीकरता स्वतंत्र खोली (बेबी केयर रूम), कॉन्कोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा,संपूर्ण स्टेशन सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत असणार आहे.

Advertisement