नागपुर : – ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप पर्यंत चारपदरी सिमेंट महामार्ग निर्माण काम मंद गतीने, अनियमित, निकृष्ट, निष्काळजीपणाने होत असल्याने या नाल्या किती दिवस टिकणार याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप पर्यंत चारपदरी सिमेंट महामार्गाचे १८ कि मी लांबीच्या निर्माण कामाचा २५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम केसीसी कंपनी ला कंत्राट देण्यात आले असून कंपनी छोटय़ा छोटय़ा काही लोकांना थोडे थोडे बांधकाम (पेटी कॉन्टयाक) दिलेले आहे.
तरी सुध्दा बांधकाम मंदगतीने सुरू असुन व्यवस्थित होताना दिसत नाही . आणि संबंधित अधिकारी ढुंकून पाहत नसल्याने कामाचा दर्जा घसरल्याने नाली स्लॉप पडुन खड्डे पडुन अपघाताला निमंत्रण देत आहे. विजय मॉकेट, डोणेकर सभागृहा सामोर नाली नागमोडी बांधण्यात आली असून थोडया समोर शुक्रवार (दि.५) ला नालीवर स्लॉप टाकताच काही वेळातच स्लॉपच्या सळाखी वर निघुन स्लॉप पडले.
हे काम ब्रिजेंद्र रत्नाकर नामक कंत्राटदारांचे मजुर करित असुन त्या कामाचे अनुभव नसलेले मजुर काम करीत असल्याचे स्पष्ट होते . काम चालु असताना सुपरवायझर चा थांगपत्ता नसताे.
निवडणुकीची धामधूम असल्याने माहामार्गाचे या कामाकडे लक्ष देऊ शकत नसेल परंतु केसीसी कंपनीच्या अधिकारी का म्हणुन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे अपघात होऊन निर्दोष लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याने बांधकामाकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी काळजीपुर्वक लक्ष केंद्रित करून काम करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे .