Published On : Sat, Mar 9th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील फुटाळा तलावाचे बांधकाम दीड महिने लांबणीवर;सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Advertisement

नागपूर: फुटाळा तलावामध्ये म्युझिकल फाउंटन शो प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याविरुद्ध स्वच्छ असोसिएशनने सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी उच्च न्यायालयाने ती याचिका निकाली काढताना फुटाळा तलावाच्या संरक्षणासाठी विविध निर्देश दिले व म्युझिकल फाउंटन शो प्रकल्पही कायम ठेवला.

त्या निर्णयाला स्वच्छ असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने फुटाळा तलाव संरक्षण प्रकरणावर २१ मार्च पर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. तसेच पुढील सुनावणी पर्यंत तलावातील बांधकामावरील स्थगितीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे किमान आणखी दीड महिना फुटाळावर कुठेलेही बांधकाम होऊ शकणार नाही.

Today’s Rate
Saturday 23 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

फुटाळा तलावाच्या संरक्षणासाठी स्वच्छ असोसिएशन या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाने गेल्या २५ जानेवारी रोजी फुटाळा तलावामध्ये कोणतेही नवीन बांधकाम करण्यास परवानगी नव्हती. पाणथळ स्थळे (संवर्धन वव्यवस्थापन) नियम-२०१७ नुसार पाणथळ स्थळांच्या यादीमधील जलाशये व जलाशयांच्या परिसरात कायमस्वरूपी बांधकाम करता येत नाही.

त्यामुळे कायद्यानुसार, फुटाळा तलावामध्ये पक्के बांधकाम केले जाऊ शकत नाही. असे असताना म्युझिकल फाउंटन शो प्रकल्पासाठी या तलावामध्ये सात हजार टन काँक्रीट टाकण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प अवैध ठरवून रद्द करण्यात यावा, अशा मागणीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Advertisement