नागपूर: महा मेट्रोच्या रिच २ अंतर्गत कामठी मार्गावरील स्टेशनचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात असून नारी रोड स्टेशनचे निर्माण कार्य सुमारे ९२% पूर्ण झाले आहे.
महा मेट्रो नागपूर अंतर्गत कस्तुरचंद पार्क -सिताबर्डी इंटरचेंज-खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान २६.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होत असून लवकरच १३.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होणार आहे.
यात सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.५ किमी आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन ५ किमी मार्गिकांचा समावेश आहे.नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच – २ अंतर्गत झिरो माईल, कस्तुरचंद पार्क, गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि आटोमोटीव्ह चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.
स्टेशनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. रस्त्यावरून स्टेशनच्या कोनकोर्स भागात जाता येते. कोनकोर्सवरून प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्याकरता तश्याच प्रकारे दोन लिफ्ट आहेत.
प्रत्येक लिफ्टची क्षमता १३ प्रवाश्यांची आहे.लिफ्ट शिवाय, रस्त्यावरून कोनकोर्स भागात तसेच कोनकोर्स भागातुन प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्याकरता डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी दोन एस्केलेटरची सोया असून या माध्यमाने खालच्या मजल्यावरून सरळ प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्याची सोया आहे. तसेच खालच्या मार्गाने कोनकोर्स पर्यंत जाण्याकरता दोन तर कोनकोर्स येथून प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता चार जिने देखील आहेत.
नारी रोड मेट्रो स्टेशनचा एकूण बिल्ट अप परिसर ४८३६ चौरस मीटर आहे. यात कोनकोर्स (१०५९ चौरस मीटर), प्लॅटफॉर्म (१०५९ चौरस मीटर) , डाव्या बाजूने प्रवेश आणि गमन (१०१४ चौरस मीटर) आणि उजव्या बाजूने प्रवेश आणि गमन (१९५ चौरस मीटर) चा समावेश आहे.