नागपूर: नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन ( निमा ) नागपूर शाखा , पाथी , दिशा फाऊंडेशन, तसेच सीटीओ नागपूर महानगर पालीका यांचे संयुक्त विद्यमाने निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) सत्राचे यशस्वी आयोजन नुकतेच हॉटेल सेंटर पॉईट, रामदासपेठ, येथे करण्यात आलेे.
या कार्यक्रमाला २५० पेक्षा जास्त आयुष डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमा नागपूरचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र अग्रवाल यांनी केले. यावेळी.मुंबई येथील प्रसिध्द छाती रोग तज्ञ डॉ. गौरव घटावत यांनी क्षयरोगासाठी नविन उपचार व उपलब्ध सोयीसुविधांची माहिती दिली. राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमार्तगत नागपूर महानगर पालीकेचे मुख्य क्षयरोग अधिकारी डॉ. तुमाने सरांनी इ. स. २०२५ पर्यंत क्षयरोग निमुर्लनाचे उदिष्ट गाठण्याचा संकल्प केला. तसेच नागपूर शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला पाथी, दिशा फाऊंडेशनच्या खदीप गांधी, वैष्णवी जोंधळे, डॉ.आशा हेगडे, नागपूर येथील प्रसिध्द फिजीशियन डॉ. रविंद्र बोथरा, डॉ. शैलेश मानेकर, डॉ.मोहन येंडे, डॉ. विनोद गंभीर, डॉ. नाना पोजगे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.राहुल राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. पंकज भोयर यांनी मानले.