Published On : Sat, Jan 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘एनआयए’चे ब्रीदवाक्य तयार करण्यासाठी नागपूरचे माजी महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांचे योगदान !

Advertisement


नागपूर:नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ( NIA ) ही भारतातील विशेष दहशतवाद विरोधी कायदा अंमलबजावणी संस्था आहे. एजन्सीला गृह मंत्रालयाच्या लेखी घोषणेनुसार राज्यांच्या विशेष परवानगीशिवाय राज्यांमधील दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासाला सामोरे जाण्याचा अधिकार आहे. नुकतेच ‘एनआयए’च्या लोगोत ‘राष्ट्ररक्षणम आद्यकर्तव्यम’ हे ब्रीदवाक्य झळकत असल्याचे तुम्हाला दिसत असेल. हे ब्रीदवाक्य तयार करण्यासाठी नागपूरचे पोलिस महासंचालक (निवृत्त) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हे ब्रीदवाक्य तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल एनआयएचे महासंचालक, आयपीएस सदानंद दाते यांनी डॉ. उपाध्याय यांना एक पत्र लिहून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण दहशतवादी हल्ला ठरलेल्या २६/११च्या हल्ल्यानंतर एनआयए अस्तित्वात आली. देशाची प्रमुख दहशतवाद विरोधी तपास संस्था म्हणून एनआयए काम करते. १३ वर्षे झालेल्या या तपास यंत्रणेचा लोगो तयार झाला होता. मात्र, त्यात ब्रीदवाक्य नव्हते. याकरिता अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. याचदरम्यान इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू अशा अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे डॉ. भूषणकुमार लेखक, उत्तम कवी अन् वक्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. दाते यांनी डॉ. उपाध्याय यांच्याशी एप्रिल २०२४ मध्ये संपर्क केला. त्यानंतर काही दिवसांतच उपाध्याय यांनी ‘राष्ट्ररक्षणम आद्यकर्तव्यम’ तयार केले.अखेर हे ब्रीदवाक्य सर्वांच्या पसंतीस पडले. त्यानंतर एनआयएच्या लोगोमध्ये हे ब्रीदवाक्य समाविष्ट करण्यात आले.देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ७ नोव्हेंबर २०२४ला त्याचे अनावरण करून एनआयएच्या लोगोसह या ब्रीदवाक्याचेही लोकार्पण केले. या कामगिरीबद्दल एनआयएचे महासंचालक, आयपीएस सदानंद दाते यांनी पत्रात म्हटले की,संस्थेच्यावतीने मोटो आणि एनआयएची टाय असलेले मोमेंटो सादर करताना आपल्याला आनंद होत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत केल्याबद्दल डॉ. उपाध्याय यांचे आभारही व्यक्त करतो असे म्हटले आहे.

कोण आहेत डॉ. भूषणकुमार उपाध्याय –
डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे नागपूरचे पोलिस महासंचालक (निवृत्त) आहेत.त्यांनी आपल्या विभागात कर्तव्यकठोर पोलिस अधिकारीसह समाजसेवेचा वसा जपला आहे. पोलिस दलातील आपली संपूर्ण कारकीर्द त्यांनी समाजातील नागरिकांच्या रक्षणासह त्यांच्या सेवेत अर्पण केली. उपाध्याय यांचे इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू अशा अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. सोबतच ते उत्तम कवी , वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अवघ्या काही दिवसांतच त्यांनी एनआयएच्या लोगोमध्ये ‘राष्ट्ररक्षणम आद्यकर्तव्यम’ हे ब्रीदवाक्य तयार केले. त्यानंतर एनआयएच्या लोगोमध्ये हे ब्रीदवाक्य समाविष्ट करण्यात आले. हे नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे.

Advertisement

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above