कुणीही पॉझिटीव नाही । प्रतिबंधक उपाय म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी ‘ होम क्वारांटाईन
रामटेक : रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दुसऱ्या शहर व राज्यातून आलेल्या 155 नागरिकांचा शोध घेत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात कुणीही पॉझिटीव्ह आढळून आले नाही. प्रतिबंधक उपाय म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी ‘ होम क्वारांटाईन ‘ करण्यात आले अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्दकिय अधिक्षक डॉ . प्रकाश उझगिरे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवर यांनी संयुक्तरित्या दिली.
कोरोना विषाणूच्या पाश्र्वभुमीवर शासनाच्या निर्देशानुसार २२ ते २७ मार्च या काळात पुणे, मुंबई व इतर शहर व राज्यातून रामटेक येथे आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्या सर्व नागरिकांची रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्दकिय तपासणी करण्यात आली. प्राथमिक रिपोर्टमधे ते सर्व जण निगेटिव्ह आढळून आले . केवळ सुरक्षितता म्हणून त्या सर्वांना १४ दिवसासाठी होम क्वारांटाईन करण्यात आले.
या काळात मुंबई, व पुण्या सह इतर शहरातून विद्यार्थीही आपल्या घरी परत आले . त्यांचीही वैद्दकिय तपासणी करण्यात आली. त्यांनाही १४ दिवस होम क्वारांटाईन करण्यात आले. त्या सर्व नागरिकांशी मोबाईलवर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रोज संपर्क साधतात.
अशी माहिती डॉ. प्रकाश उझगीरे आणि डॉ चेतन नाईकवार यांनी दिली. उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारे आणि तहसीलदार बाळासाहेब मस्के परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत.कोरोनाचा सामना करण्यासाठी व रुग्णावर उपाययोजना करण्यासाठी रामटेक येथे योगीराज हॉस्पिटल येथे पाच ,किमया हॉस्पिटलमध्ये पाच व उपजिल्हा रुग्णालयात आठ आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती वैदकिय अधिक्षक डॉ उझगीरे यांनी दिली.