Advertisement
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट (coronavirus) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ‘एक्सबीबी १. १६’ची संख्याही वाढत चालली आहे.
काल जिल्ह्यात नव्याने १९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आयोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. तर १३०बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे. तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे १०० रुग्ण वाढले आहेत.
तर दुसरीकडे प्रशासनाने नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बगळण्याचे आवाहन केल्यानंतरही नागरिकांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते.