कामठी — आज दिवसभरात झालेल्या कोरोना चाचणी तपासणी अहवालात एकूण 40 रुग्ण कोरोना पॉजीटीव्ह आढळले.यानुसार आजपावेतो एकूण कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या ही एकूण 298 आहे त्यातील 70 रुग्णांनी कोरोनावर मात करून उपचार घेऊन बरे झाले आहेत यानुसार एकूण 228 रुग्ण सध्यस्थीतीत उपचार घेत आहेत यातील 89 अहवाल अजूनही प्रलंबित आहेत. तर आजपावेतो कोरिणाबधित मृत्यू संख्या ही 06 आहे.
आज 40 कोरोना पॉजीटिव्ह रुग्णामध्ये नया बाजार 07, छत्रपती नगर 06, तुंमडीपुरा 01, जयभीम चौक 09, नया गोदाम 01, येरखेडा 01,वारीसपुरा 07, पेरकीपुरा 01, हरदास नगर 02, गुंमथळा 01, उंटखाना 01,कोळसाटाल 02, कुंभारे कॉलोनी 01 रुग्णाचा समावेश आहे.
या सर्व कोरिना बाधित रुग्णांना नागपूर येथील विलीगीकरणं कर्क्षात हलविण्यात आले तर या रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्याना कँटोनमेंट झोन येथे सुरक्षित हलविण्यात आले