कामठी – कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात कोरोना प्रतिबंधक लस हा मोठा दिलासा आहे मात्र सध्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना लाभ घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. लस उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे व कामठी शहर आणि तालुक्या करिता पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय माने यांना सोपविले,शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपा शहराध्यक्ष संजय कनोजिया यांनी केले
लसी अभावी शहरातील अनेक केंद्र बंद करावी लागली असून तहसील प्रशासनाने केंद्र जाहीर केल्यानंतरही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे लस उपलब्ध नसल्याचे चित्र आहे भर उन्हात ज्येष्ठांना आल्या पावली परत जावे लागत आहे लसीचा पहिला डोस झाला आणि दुसरा डोस घेण्यासाठी तारीख पुढे जात असल्याने अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे यासंदर्भात प्रशासनाकडून मात्र कुठलीही आश्वासक माहिती दिली जात नसल्याने गोंधळ उडत आहे
संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले कामठी शहर व तालुक्यात आणि कामठी कॅंटोनमेंट भागात लसींचा पुरेसा पुरवठा करावा त्याचे नियोजन व व्यवस्थापन तहसीलदार, खंडविकास अधिकारी, कामठी कन्टोनमेंट मुख्याधिकारी कामठी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नगर परिषद विरोधी पक्षनेते लालसिंग यादव, नगरसेवक प्रतीक पडोळे, नगरसेवक राजू पोलकमवार, भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले, राजकुमार हाडोती, रमेश वैद्य,सुनील खानवानी,विनोद संगेवार यांचा समावेश होता