Published On : Thu, Sep 30th, 2021
By Nagpur Today Nagpur News

मनपाचे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत मागे राहणार नाही : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

महापौरांच्या हस्ते मनपाच्या विद्यार्थ्यांना ई-टॅबलेटचे वितरण

नागपूर : लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षांपासून नागपूर महानगरपालिका विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण शक्य नाही त्यांना त्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्यात येत आहे. मनपा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता यावा. यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या टॅबचा मार्ग मोकळा करण्यात आला. आज विद्यार्थ्यांच्या हातामध्ये टॅब देताना आनंद होत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणारे टॅब नव्या तंत्रज्ञानाशी त्यांना जोडून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास नक्कीच बळ देईल. येणा-या काळात नागपूर महानगरपालिकेचे विद्यार्थी कुठल्याही स्पर्धेमध्ये मागे राहणार नाही असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

Gold Rate
Friday 28 March 2025
Gold 24 KT 89,400 /-
Gold 22 KT 83,100 /-
Silver / Kg 101,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या संजय नगर माध्यमिक शाळा व डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. २९) महापौर दयाशंकर तिवारी व शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांच्या हस्ते ई-टॅबलेटचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, शिक्षण समिती सदस्या संगीत गि-हे, प्रभाग २४चे नगरसेवक अनिल गेंडरे, नगरसेविका चेतना टांक, सरिता कावरे, प्रभाग २२चे नगरसेवक मनोज चापले, राजेश घोडपागे, नगरसेविका वंदना यंगटवार, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र सुके, संजयनगर शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र गावंडे, डॉ. राममनोहर लोहिया शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर, शिक्षण विभागाचे विनय बगले आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाले, नागपूर शहरातीलच्या मनपाच्या शाळांमधील एकूण १९३८ विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढल्यामुळे जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना ई-टॅबलेट देण्यात येणार आहेत. या कार्याचा शुभारंभ संजयनगर शाळेमधून करण्यात आला असून येथील २३८ विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. टॅबद्वारे ऑनलाईन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात इंटरनेटअभावी खंड पडू नये यासाठी मनपातर्फे इंटरनेटसुद्धा पुरविण्यात येणार आहे. टॅबलेटचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. टॅबलेटमध्ये केवळ शैक्षणिक आणि नागपूर महानगरपालिकेची माहिती देणारे ॲप असणार आहेत. शिक्षणापासून विद्यार्थ्यांचे मन परिवर्तन होईल, त्यांच्यावर परिणाम होईल अशा प्रकारचे कोणतेही संकेतस्थळ अथवा ॲप यावर ओपन होणार नाही याची विशेष खबरदारी घेत टॅबलेटची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.

मागील अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना टॅबलेट वितरणामध्ये अनेक प्रशासकीय अडथळे निर्माण झाले. मात्र हे सर्व अडथळे पार करून शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे आणि मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर यांनी सातत्याने या विषयाच्या अनुषंगाने पाठपुरावा करून तो मार्गी लावल्याबद्दल महापौरांनी शिक्षण सभापती व शिक्षणाधिका-यांचे विशेष अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement