चाईल्ड हेल्पलाईनच्या १०९८ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन
नागपूर: कोव्हीड-19 या रोगाच्या अभूतपूर्व परिस्थिती मध्ये बालकांची काळजी व संरक्षणाशी संबधित कार्यरत संस्था मधील बालकांची योग्य काळजी घेण्याच्या अनुषंगाने तसेच सद्यस्थितीत कोव्हीड-19 या रोगाचा वाढलेला संसर्ग व त्यामुळे बाधीत व्यक्तीचे मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचार घेता त्याच्या बालकांच्या जिवनावर गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोव्हीड-19 या रोगामुळे दोन्ही पालकांचे (आई व वडील) निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सदर बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने सदर बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी यासारख्या गुन्ह्यामध्ये ओढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या अनुषंगाने कोव्हीड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे संगोपन होण्यासाठी जिल्हा स्तरावर बालकांचा काळजी व संरक्षणासाठी कृती दल (Task Force) गठीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका स्तरावर सुद्धा कृती दल गठीत करण्यात आली आहे. ही माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत यांनी दिली.
कोव्हीड-19 या रोगामुळे0 ते 18 या वयोगटातील बालकांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले असल्यास अथवा कोव्हीड-19 या आजाराकरिता दोन्ही पालक (आई व वडील) रुग्णालयात दाखल असल्यास किंवा होत असल्यास त्यांच्या पाल्याचा ताबा कोणाकडे द्यायचा तसेच हक्काचे संरक्षण करायचे असल्यास खालील नमूद केलेल्या झोन निहाय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून किंवा नमूद केलेल्या E-Mail वर माहिती उपलब्ध करून देण्याबाबतचे व त्याचप्रमाणे कोव्हीड-19 मुळे दोन्ही पालक (आई व वडील) गमावलेल्या बालकांना संरक्षण प्राप्त व्हावे याकरिता Child Helpline १०९८ यावर संपर्क करून सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबतचे मा. आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी आव्हान केले आहे.