Published On : Tue, Jul 6th, 2021

हुडकेश्वर-नरसाळा पाणीपुरवठा योजनेसाठी मनपाचा ६३.०५ कोटीचा प्रकल्प

Advertisement

राज्य शासनाचा ८० व मनपाचा २० टक्के वाटा : परिसरात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी महत्वाचे पाउल

नागपूर: नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागामध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी नागपूर महानगरपालिकेने ६३.०५ कोटीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे. या प्रकल्पामध्ये राज्य शासनाचा ८० टक्के म्हणजे ५०.४४ कोटी व मनपाचा २० टक्के म्हणजे १२.६१ कोटी रुपये एवढा वाटा असणार आहे. हुडकेश्वर व नरसाळा या मनपा क्षेत्रातील नव्या भागांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे व त्यासाठी त्याची निर्मिती करण्याच्या दृष्टीने मनपाने महत्वाचे पाउल उचलले आहे.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हुडकेश्वर-नरसाळा परिसरामध्ये पायाभूत सोयीसुविधा करण्यास महानगरपालिकेस विशेष अर्थसहाय्य देण्याच्या योजनेस राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान केली आहे. त्याअंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्याच्या ६३.०५ कोटीच्या प्रकल्प अहवालास राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. या अहवालामध्ये एकूण चार उपांगांचा समावेश आहे. उपांग भाग १ मध्ये ६०० मी.मी.व्यासाची फिडरमेन्स टाकण्याचे काम असून त्यासाठी १०.१७ कोटी निविदा मंजुर राशी आहे. उपांग भाग २ मध्ये हुडकेश्वर व नरसाळा येथे असे एकूण ४ जलकुंभाचे बांधकाम करण्याकरिता ९.३८ कोटी रुपये राशी मंजुर करण्यात आलेली आहे. उपांग भाग ३ मध्ये मौजा हुडकेश्वर येथे वितरण नलिका टाकण्याच्या कार्यासाठी १८.४७ कोटी आणि उपांग भाग ४ मध्ये मौजा नरसाळा येथे वितरण नलिका टाकण्यासाठी १८.७० कोटी रुपये राशी मंजुर करण्यात आली आहे. चारही कार्यासाठी एकूण ५६.७२ कोटी राशी मंजुर आहे.‍ महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांची सूचनेनुसार स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी अंदाजपत्रकात याचा समावेश केला आहे.

६०० मी.मी.व्यासाची फिडरमेन्स टाकण्याच्या कार्यांतर्गत बहुतांशी कार्य पूर्ण झालेले आहे. या उपांगातर्गत १०.६० किमी लांबिची जलवाहिनी टाकणे अपेक्षित होते. प्रकल्पाची एकूण लांबी ९.६२ किमी असून काम पूर्ण झालेले आहे. पॅकेज दोन अंतर्गत हुडकेश्वर व नरसाळा येथे प्रत्येकी दोन जलकुंभांचे बांधकाम प्रस्तावित होते. त्यामध्ये हुडकेश्वर येथील चंद्रभागानगर जलकुंभ व नरसाळा येथील संभाजी नगर व भारतमाता लेआउट येथील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. हुडकेश्वर येथील ताजेश्वर नगर येथील जलकुंभाचे काम प्रगतीपथावर असून कामाची भौतीक प्रगती ९० टक्के एवढी आहे.

पॅकेज तीन अंतर्गत मौजा हुडकेश्वर परिसरात एकूण ८७ किमी जलवाहिनी टाकणे अपेक्षित होते. त्यापैकी ८१.६३ किमी जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले आहे. लोकवस्ती असलेल्या भागातील वितरण नलिका टाकण्याचे काम पूर्ण झालेले असून ते मनपास हस्तांतरीत सुद्धा करण्यात आले आहे. पॅकेज चार अंतर्गत नरसाळा परिसरात निविदा परिमाण एकूण ६७ किमी होते. त्यात सुधारणा करण्यात आली. आता प्रकल्पाची सुधारित लांबी ८४.६७ किमी असूल त्यापैकी ८४.२९ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे.

Advertisement
Advertisement