नागपूर: शेतकऱ्याला लुटणाऱ्या सरकारचार धिक्कार असो’, अशा घोषणा देत विरोधकांचे विधानभवन परिसरातील पायऱ्यांवर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याबाबत अधिक सांगताना म्हणाले,‘राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत.सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही.
धानाला बोनस नाही, अशी स्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.’ आमदार सतेज पाटील म्हणाले,‘महागाई वाढली असून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हवालदिल झाला आहे, यावेळी आंदोलनात नाना पटोले, सुनील प्रभू, भाई जगपात, अमित देशमुख, संदीप क्षीरसागर, सुनील शिंदे, संजय मेश्राम, नितीन राऊत, विकास ठाकरे, प्रज्ञा सातव आदी आमदार सहभागी झाले होते.