नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत. उमेदवार असो की मतदार नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जनतेचा कौल कोणाच्या बाजूने याकरिता सकाळी ८ वाजता पासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
मतदानाच्या दिवशी उमेदवारांचे भवितव्य बंद झालेल्या मतपेट्या उघडल्या असून मत मोजणी सुरु झाली आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजपने बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर जल्ह्यातील सहा जागांवर भाजप आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून १३० हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत.
या कलांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महायुती ७० तर महाविकास आघाडी ६० जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा ४५, शिंदेसेना १४, अजित पवार १४, काँग्रेस २३, ठाकरेसेना १७, शरद पवार २१ आणि मनसे एका जागेवर आघाडीवर आहेत.