Published On : Thu, Apr 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रेसिडेन्शियल फ्लॅटमध्ये देहव्यापार चालवत असलेल्या दाम्पत्याला अटक; एका महिलेची सुटका

Advertisement

नागपूर – खरबी चौकाजवळील विशाखा अपार्टमेंटमधील रहिवासी फ्लॅटमधून देहव्यापार चालवत असल्याच्या आरोपावरून नंदनवन पोलिसांनी बुधवार, ९ एप्रिल रोजी एका दाम्पत्याला अटक केली. या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली, जिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.

आरोपींची ओळख गोविंद कोमल भार्गव (३२) आणि त्यांची पत्नी पूजा उर्फ जान्हवी भार्गव अशी झाली आहे. हे पूर्वी फ्लॅट क्रमांक १०२, विशाखा अपार्टमेंट, खरबी चौक येथे राहत होते.ही दोघे सध्या प्राधान मंत्री आवास योजना, गेट क्रमांक २, बिल्डिंग नंबर ३३७, सिम्बायोसिस कॉलेजसमोर, वाठोड़ा येथे राहतात.

Gold Rate
14 April 2025
Gold 24 KT 94,000/-
Gold 22 KT 87,400/-
Silver / Kg - 95,100/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांच्या माहितीनुसार, या दाम्पत्याने पीडितेला भरघोस पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडले.ते आपल्या खासगी फ्लॅटमध्ये ही बेकायदेशीर क्रिया घडवून आणत होते. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी ठिकाणी धाड टाकून महिलेची सुटका केली.घटनास्थळावरून एकूण ३९,१४४ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १४३(३) आणि ३(५) अन्वये, तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा, १९५६ मधील कलम ४, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांच्या नेतृत्त्वात सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, उपायुक्त (गुन्हे) राहुल मकनिकर आणि सहायक आयुक्त (गुन्हे) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

छापा टाकणाऱ्या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक कविता इसरकर यांनी केले. या पथकात प्रकाश माथणकर, लक्ष्मण चोरे, अजय पौनिकर, नितीन वसाने, समीर शेख, कुणाल मसराम, लता गवई आणि वाहनचालक कमलेश क्षीरसागर यांचा समावेश होता.

Advertisement
Advertisement