Published On : Tue, May 2nd, 2017

स्काईपवरून देता येणार घटस्फोट

Advertisement

Skype
मुंबई:
आता स्काईपवरून घटस्फोट घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे दिवानी न्यायालयानं पहिल्यांदाच ऑनलाइन सुनावणी घेत
स्काईपचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. तसंच स्काईपवरून बाजू मांडण्यास परवानगी देऊन न्यायलयानं घटस्फोट देखील मंजूर केला आहे. स्काईपवरून सुनवाई होऊन घटस्फोट मिळाल्याची ही पहिलीच घटना आहे.

सविस्तर वृत्त असे की अर्जदार दाम्पत्य हे कॉलेजला असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमरावतीमध्ये त्यांचं लग्न झालं. त्यानंतर ते दोघंही पुण्यात शिफ्ट झाले. हिंजवडीत वेगवेगळ्य़ा कंपनीत दोघे काम करत होते. महिन्याभरानंतर दोघांनाही परदेशी जाण्याची संधी मिळाली. पतीला सिंगापूर तर पत्नीला लंडनमध्ये जाण्याची ऑफर होती. पती सिंगापूरला निघून गेला, मात्र पत्नीला मागेच थांबावे लागले. आपले लग्न करिअरमध्ये अडथळा ठरू लागल्याचे तिने अर्जात सांगितले होते. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यावेळी त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

एकमेकांच्या सहमतीने दोघांनी 2016 ला घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतर महिला पुन्हा लंडनला निघून गेली. वकिलाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी व्हावी अशी विनंती केली असता न्यायालयाने ती मान्य केली. शनिवारी पती सुनावणीला हजर राहण्यासाठी सिंगापूरहून भारतात आला. मात्र वैयक्तिक कारणांमुळे पत्नीला लंडनहून येणे शक्य नव्हते. यावेळी न्यायालयाने जुन्या पंरपरेप्रमाणे पुढची तारीख न देता नेहमीपेक्षा वेगळा निर्णय देत स्काईपवरून हजर राहत आपली बाजू मांडण्याची परवनागी दिली. पती न्यायालयात उपस्थित असताना पत्नी स्काईपच्या माध्यमातून आपली बाजू मांडत होती. अखेर न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केला.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement