Advertisement
नागपूर : राज्य शासनाकडून कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी २५ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.
मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज तसेच पात्र नागरिकांसाठी बूस्टर डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच १५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस मोठया प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहे.
लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.