Published On : Thu, Apr 29th, 2021

‘लसी’च्या सहाय्यानेच जिंकता येणार कोविड युध्द

Advertisement

भंडारा:- कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व मोठ्या प्रमाणावर होणारे संक्रमण थोपवायचे असल्यास यावर प्रभावी उपाय काय याबाबत भंडारा शहरातील तज्ञ डॉक्टरांनी एकमताने सांगितले केवळ आणि केवळ कोविड ‘लस’. शस्त्राशिवाय जसे युध्द जिंकता येत नाही. तसेच ‘लसीकरणा’ शिवाय ‘कोरोना’ युध्द जिंकता येणार नाही. लसीच्या सहाय्यानेच कोरोनाला मात देणे शक्य होणार आहे. मनात कुठलाही गैरसमज न ठेवता ‘लस’ घ्या व आपले जीवन सुरक्षित करा, असा मोलाचा सल्ला शहरातील नामांकित डॉक्टरांनी दिला. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांनी स्वत: लस घेतली आणि कोरोना सारख्या अतिजोखमीच्या रुग्णांवर ते आता निर्धास्तपणे उपचार करत आहे.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

·डॉ. नितीन तुरसकर:- लसीकरणाबाबत बरेच गैरसमज नागरिकांच्या मनात आहे. लस घेतल्यामुळे पॉझिटिव्ह आलो असेही काही जण म्हणातात. ही बाब तथ्थहीन आहे. लसीमुळे हलकासा ताप येतो मात्र पॉझिटिव्ह येणाचे कारण सहव्याधी असणार आम्ही डॉक्टर कोरोना रुग्णावर नियमीत उपचार करतो. अतिशय जोखिम बाळगुन डॉक्टरांना रुग्णावर उपचार करावे लागतात. मी स्वत: लस घेतली आहे. आणि आजही ठणठणीत बरा आहे. त्याचे एकमेव कारण लस आहे. लस घेणाऱ्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो, मात्र मृत्यू होणार नाही. तेव्हा लसीचे महत्व ओळखा व आपले जीवन सुरक्षित करा.

· डॉ. शिल्पा जयस्वाल:- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर नियमीत उपचार करतांना आपली सुरक्षा काय असा प्रश्न जेव्हा आम्हा डॉक्टरांच्या मनात येतो तेव्हा लसीकरण हेच एकमेव उत्तर असते आणि म्हणून सर्वप्रथम लस घेऊन मी स्वत:चे जीवन सुरक्षित केले व आता कोरोना रुग्णांवर निश्चिंतपणे उपचार करत आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी लसीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी तुम्हाला पुर्णपणे सुरक्षित ठेवतात. लस अवश्य घ्या ‘लस’ तुम्हाला प्रतिकार शक्ती प्रदान करेल.

·डॉ. रोहित वाघमारे:- कोरोना विषाणूचा संसर्ग हा तिव्रतेने वाढू द्यायचा नसेल तर लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर कोरोना फुफ्फुसापर्यंत पोहचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कोरोनाला हरविण्यासाठी आपल्याकडील एकमेव शस्त्र म्हणजे लस आहे. लसीबाबत आपल्या मनात असलेले गैरसमज तात्काळ दूर करा. दोन्ही लसी सुरक्षित असून मी स्वत: लस घेतलेली आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या व लसीबाबत अफवा पसरवू नका. लसच तूम्हाला कोरोना पासून वाचविणार आहे, हे कायम लक्षात असू द्या.

· डॉ. गोपाल सार्वे:- मी स्वत: लस घेतली आहे. ज्या ठिकाणी संसर्ग जास्त असतो अशा वातावरणात आम्ही काम करतो. लस घेतल्यानंतर अतिशय जोखमीच्या वातावरणात काम करून सुध्दा साधा ताप देखील आला नाही. याची दोन कारणे आहेत. एक तर ‘लस’ आणि दुसरे दक्षता. लस घेतल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपले जीवण सुरक्षित करण्याच्या दृष्टीने लसीकरण एकमेव उपाय आहे. लस घ्या व कोरोनापासून मुक्त रहा, लसच तूम्हाला कोरोनापासून खात्रीचे संरक्षण देणार आहे.

Advertisement
Advertisement