Published On : Thu, Feb 10th, 2022

गुरुवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

Advertisement

नागपूर : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १५ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत होणार आहे.

या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.

Advertisement

लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. तसेच ग्लोकल मॉल, बर्डी येथील ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा सर्व नागरिकांचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यत होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली.