नागपूर: एकतर्फी प्रेमातून हल्ला तरुणींवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. मात्र नागपुरात कुत्र्यावर ॲसिड हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 13 जून रोजी जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. प्रताप राघव जाधव (नागार्जुन कॉलोनी), आदेश उर्फ लक्की दीपक वानखेडे अशी संशयित आरोपीची नावे आहेत.
माहितीनुसार, जरीपटका परिसरातील नागार्जुन कॉलनी येथे राहणाऱ्या आदर्शसिंग रविशंकर ठाकुर (वय 45,प्लॉ. न.516,) हे आपल्या परिवारासह कोराडी देवस्थान येथे दर्शनाकरीता गेलो होतो. त्यांनी त्यांच्या घरच्या कम्पाउन्डच्या आत असलेल्या कुलरच्या स्टँडला त्यांच्या पाळीव कुत्र्याला बांधून ठेवले होते.
जेव्ह ठाकुर कुटूंब घरी पोहोचले. तेव्हा त्यांना त्यांच्या कुत्रीच्या पाठीच्या आणि उजव्या पायाचे केस जळालेला दिसले. कुत्र्यावर ॲसिड हल्ला झाल्याचा संशय त्यांना आला. शेजारी राहणाऱ्या प्रताप जाधव यांना त्यांनी विचारपूस केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तर देत काही माहिती नसल्याचे म्हटले.
त्यानंतर ठाकुर हे कुत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना जाधव यांना विचारपूस केली असता भाचा लक्की याच्या हातून कुत्र्याच्या अंगावर चुकून चहा पडला. ठाकूर यांनी लक्कीची विचारपूस केली असता त्याने मामा प्रताप जाधव यांनी कुत्र्याच्या अंगावर गरम पाणी टाकल्याचे म्हटले. मात्र या दोघांनी काळ्या रंगाचा पॉनेलियन कुत्र्यावर ॲसिड हल्ला केल्याचा आरोप करत ठाकूर यांनी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीवीरोधात भारतीय दंड संहिता 1960 ,कलम 428 ,38 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.