नागपूर :शहरात गुन्हे शाखने धडाकेबाज कारवाई करत तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गांजा बागळणाऱ्या आरोपींना अटक –
गुन्हे शाखेकडून पहिली कारवाई जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली. याठिकाणी गांजा बगळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या परिसरात असलेल्या प्लॉट नं. १२, आर्यनगर येथे गांजाची देवान- घेवान करतांना ४ आरोपींना अटक केली. उमरेखान अब्दुल रशीद खान ( वय ३०), दरक्षा अंजुम उर्फ राणू खान उमेर खान (वय २९ दोन्ही रा. कांजीहाऊस चौक, रमाईनगर, यशोधरानगर), शेख रिजवान शेख युनूस वय ( वय २४ रा. ईस्लामीक चौक, जुनी वस्ती बडनेरा, जि. अमरावती ),अब्दुल आरीफ वल्द अब्दुल खालीक (वय ३२ , रा. आजरी माजरी बाबा दिवान मस्जिद जवळ, यशोधरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एकूण ९३ किलो १२० ग्रॅम गांजा जप्त केला.ज्याची किंमत १८ लाख ६२ हजार ४०० रुपये इतकी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी मोहम्मद जुनैद ईब्राहीम राजवानी(वय ३१ वर्षे, रा. शिवनगर, यशोधरानगर) यालाही बेड्या ठोकल्या. तसेच काशीफ अहमद(रा. ताजनगर, जि. अमरावती, ह.मु., जाफर नगर) याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जरीपटका पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला असल्याचे सीपी सिंगल म्हणाले.
नागपुरातील पारडी येथे ८ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ५६ वर्षीय आरोपीला अटक-
पारडी परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीला रविवारी, १५ सप्टेंबर रोजी दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सखोल शोध घेतल्यानंतर पोलिसांनी गणपत तानाजी जयपूरकर (५६, रा. भवानी नगर, पारडी) या आरोपीला अटक केली. २०२२ मध्ये गणपतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. माहितीनुसार, पीडितेचे आई-वडील मजुरीचे काम करतात आणि तिला ४ वर्षांची लहान बहीणही आहे.
रविवारी आरोपी गणपती पीडितेच्या घरी आला. घरात दुसरे कोणी नसल्याची माहिती मिळताच आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिच्या लहान बहिणीसमोरच तिच्या ९ वर्षाच्या मोठ्या बहिणीवर बलात्कार केला. लहान बहिणीला तोंड बंद ठेवण्यासाठी २० रुपये देऊन तो घटनास्थळावरून पळून गेला. संध्याकाळी आई-वडील परतल्यावर पीडित मुलीने आईला आपला त्रास कथन केला. घडलेल्या प्रकाराने हैराण झालेल्या आई -वडिलांनी पारडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तपासानंतर पोलिसांनी आरोपी गणपतला पकडून पारडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगारास अटक एकूण ५ गुन्हे उघडकीस-जरीपटका हद्दीत प्लॉट नं. १२७, नूरी कॉलोनी, मस्जिद जवळ राहणाऱ्या फिर्यादीसोहेल असलम खान (वय ३५ वर्षे) हे घरी नसताना त्यांच्या घरी चोरीची घटना घडली. त्यांच्या घरून सोन्या – चांदीचे दागिने आणि ४ लाख रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे.
या प्रकरणी गुन्हेशाखा युनिट ३ च्या पथकाने आरोपीला अटक केली.संदीप खेमचंद टेंभरे,( वय २४, रा. ग्राम डुंडा, बरघाट, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कन्हान येथील साई मंदीराचे परिसरातून त्याला अटक करण्यात आली. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने ५ घरफोडी केल्याची माहिती दिली यात त्याचे इतर पाच साथीदारही सहभागी झाले होते. आरोपींकडून पोलिसांनी १२,७९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करू पुढील तापस सुरू केला आहे.