Advertisement
नागपूर: इंडो एशियाई मेत्ता फाउंडेशन, आवाज़ इंडिया टीवी, वर्ल्ड अलायंस ऑफ़ बुद्धिस्ट, बाट प्रा टेम्पल च्या वतीने एक्सलेंस जर्नलिजम अवार्ड्स नागपुर टुडे न्यूज पोर्टलचे क्राईम रिपोर्टर रविकांत कांबळे यांना देण्यात आला. तसेच लोकमत समाचार चे योगेंद्र शंभरकर ,भीमराव लोणारे , विजय खवसे , मुकेश हेडाऊ , निलेश डोहे , केवल जीवनतारे ,रवी गजभिये , योगेश चिवंडे व इतर पत्रकारांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन डॉ. आंबेडकर इंटरनेशनल कन्वेनशन सेंटर येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाला सोमू पेयरोज ओपासो, (भदंत पायरोथ, थाईलैंड ) सुश्री.गिटिटोरन रत्नत्रिफोर (थाईलैंड),डॉ. सिद्धार्थ गायकवाड़ क्षेत्रीय उपयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अमन कांबळे आवाज़ इंडिया टीवीचे सीईओ उपस्थित होते.