Advertisement
कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौक मार्गे कन्हान हुन कामठी कडे येत असलेल्या चारचाकी वाहन क्र एम एच 31 इ क्यू 0823 ने चालक संशयीतरीत्या दिसून आल्याने रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांनी सदर वाहनाचालकला ताब्यात घेत वाहनाची झडती घेतली असता त्याच्याकडे 13 इंच लांबी चा एक धारदार शस्त्र आढळून आला तसेच हा आरोपी कुठलातरी गंभीर गुन्हा घडविण्याच्या बेतात होता मात्र वेळीच पोलिस उपनिरीक्षक वारंगे यांनी सदर आरोपीस ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
अटक सराईत गुन्हेगारांचे नाव आशिष उर्फ मोनू मनपिया वय 27 वर्षे रा कन्हान असे आहे.तर या कारवाहितुन 3 लक्ष 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तप्पास सुरू आहे.