नागपूर: नागपूर मध्ये आज सकाळी पासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पावसाळी अधिवेशनाला फटका बसला असून विधान भावनाच्या तळघरात इलेक्टरीक केबिन मध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.
त्यामुळे दहा वाजता सुरू होणार कामकाज एक तास उशिरा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा विधान सभेचे अध्यक्ष हरुभाऊ बागडे यांनी केली.
दरम्यान केवळ पावसाने वीज पुरवठा खंडित होण्यामुळे विधान सभेचे कामकाज न होणे ही सरकार साठी भूषणावह नाही.
महाराष्ट्राच्या इतिहासात हा काळा दिवस म्हणून गणला गेला पाहिजे असा संताप राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. तर मुंबई मध्ये थोडा पाऊस झाला तर महापालिकेला दोषी धरले जाते .
आता थेट विधान भवनाच्या तळघरात पाणी शिरला आहे,तेव्हा कुणाला दोषी धरायचे असा सवाल शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशन नागपूर मध्ये होत असताना आवश्यक ती काळजी का घेण्यात आली नाही, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ही प्रभू यांनी केली…