Published On : Tue, May 7th, 2019

ग्राहक जागृतीत जनसंपर्क विभाग आणि माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण

Advertisement

महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. पाटील यांचे मत

नाशिक: जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आहे. या सुविधांबाबत ग्राहकांमध्ये जागृती घडवून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यात महावितरणचा जनसंपर्क विभाग आणि प्रसार माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण ठरत असल्याचे मत मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महावितरणच्या जनसंपर्क विभागात कार्यरत अधिकाऱ्यांसाठी नाशिकस्थित व नव्याने स्थापन झालेल्या वीज व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्थेत आयोजित तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. प्रशिक्षण केंद्रातील कार्यकारी अभियंता श्री. अनिल नागरे, श्री. देवेंद्र सायनेकर, समन्वयक सुषमा सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. पाटील म्हणाले, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक व कर्मचाऱयांसाठी मोबाईल अँप (APP), वेब पोर्टलच्या माध्यमातून सर्व सेवा घरबसल्या व ऑनलाइन, अंतर्गत संगणकीकरण, डॅशबोर्ड आदींच्या माध्यमातून कामात सुलभता, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी आदी कामे प्रभावीपणे पूर्ण झाली आहेत. कंपनी व्यवस्थापन आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या जनसंपर्क विभागासाठी प्रसारमाध्यम हे संवादाचे प्रभावी साधन आहे. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, माध्यमांमधील नवीन बदल, प्रवाह याबाबत सजग राहून जनसंपर्क विभाग आवश्यक त्या बदलासह ग्राहकसेवेत सज्ज आहे. हा विभाग अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी व्यवस्थापनही सकारात्मक आहे, असे श्री. पाटील म्हणाले.

प्रशिक्षणात मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. पाटील, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. अनिल कांबळे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भरत पवार, योगेश विटणकर, सुनील जाधव, जनसंपर्क अधिकारी श्री. अजित इगतपुरीकर, निशिकांत राऊत, धनंजय पवार, मोहन दिवटे, विकास पुरी, विकास आढे, आनंद कुमरे, फुलसिंग राठोड, ज्ञानेश्वर आर्दड, किशोर खोबरे, विश्वजित भोसले, विजयसिंह दुधभाते यांनी सहभाग घेतला.

Advertisement
Advertisement