Published On : Sat, Apr 3rd, 2021

४०० मी मी दाभा मुख्य जलवाहिनीवरील गळती बंद करण्यासाठी ८ तासांचे शटडाऊन

Advertisement

दाभा भागाचा पाणीपुरवठा ५ एप्रिल (सोमवारी) राहणार बंद

नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि ocw ह्यांनी ४०० मी मी व्यासाच्या दाभा मुख्य जलवाहिनीवरील उद्भवलेल्या गळती ला थांबविण्यासाठी ८ तासांचे शटडाऊन येत्या सोमवारी , ५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घेण्याचे ठरविले आहे.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दाभा टाकीजवळच उद्भवलेल्या ह्या गळतीमधून अधिक जास्त प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे हे काम घेण्यात येत आहे

या ८ तास शटडाऊन दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

दाभा जलकुंभ धरमपेठ झोन: भिवसेन खोरी, चिंतामण नगर, गौतम नगर, हजारी पहाड , गायत्री नगर, आशा बालवाडी भाग, कृष्ण नगर, सरोज नगर, मनोहर विहार कॉलोनी, संत कृपा सोसायटी, प्रीती- का-ओप सोसायटी, शिवकृपा सोसायटी, वराडकर ले आउट, नशेमन सोसिती, शशिकांत सोसायटीम अनुपम सोसायटी, गंगा नगर, कोलबास्वामी कॉलोनी, दुम्ब्रे ले आउट, वेलकम सोसायटी, KGN सोसायटी, अखिल विश्वभारती सोसायटी, जगदीश नगर , मकरधोकडा …

शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या पाण्याविषयी माहिती किवा तक्रारीकरिता नागपूर महानगरपालिका- OCW’s Toll Free Number 1800 266 9899 वर संपर्क साधावा .

Advertisement
Advertisement