नागपूर : दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो.उद्या ७ सप्टेंबरला नागपुरात ठिकठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शहरात दहीहंडी उत्सवाला राजकीय रंग येण्यास सुरुवारत झाली असून विविध राजकीय पक्ष यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार आहेत. तसेच शहरात दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जन्माष्टमीनिमित्त सध्याच्या राजकीय घडामोडींनी जोर धरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध भागांत दहीहंडी स्पर्धांच्या आयोजनांसाठी विविध राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता ठिकठिकाणी मतदारसंघात होर्डिंग लावण्यात आले आहे.
मानेवाडा, इतवारी, गोकुळपेठ, रविनगर, अंबाझरी, वर्धमाननगर, नरेंद्रनगर, श्रीकृष्ण नगर, खामला, नंदनवन, सक्करदरा, बडकस चौक, वर्धमाननगर यासह रामटेक, काटोल आणि उमरेडमध्ये दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात अधिकृत १६ गोविंदा पथके असली तरी अनेक संस्था यानिमित्ताने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत असतात, हे विशेष. दरम्यान जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो.
दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. आजमितीला प्रत्येक विभागातून विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी लावले जाते. ही हंडी तरुणांची विविध मंडळे फोडण्याचा प्रयत्न करतात. जन्माष्टमी जशी जवळ येते तसे तरूण दहीहंडी फोडण्याचा सराव करतात. हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते. या दहीहंडी उत्सवादरम्यान कोट्याविधींची उलाढार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.