नागपूर : सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांना मेट्रो भाड्या मध्ये 30% सवलत दिल्यानंतर, महा मेट्रो आपल्या सर्व प्रवाशांसाठी आणखी एक सुविधा देण्यासाठी सज्ज आहे. उद्या दिनांक 25 फेब्रुवारी (शनिवार) नागपूर मेट्रोच्या सर्व प्रवाश्यानकरता डेली पास उपलब्ध केल्या गेली आहे. रु. 100 मध्ये प्रवाशांना कोणत्याही मेट्रो मार्गिकेवर कुठल्याही दिवशी अमर्यादित प्रवास करण्याकरता उपलब्ध राहील.
मेट्रो प्रवासी डेली पासचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांना पाहिजे तितक्या (राइड्स) मेट्रोने प्रवास करू शकतात. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या कालावधीमध्ये मेट्रो सेवा सुरु असेल. प्रवासी कोणत्याही दिवशी नागपूर मेट्रोच्या ऑरेंज किंवा ऍक्वा लाईनवर प्रवास करू शकतो. या पासवर एकच व्यक्ती प्रवास करू शकतो.
डेली पास मेट्रो स्टेशन येथून तिकीट खरेदी करण्याइतकेच सोपे असून प्रवाशाला मेट्रो स्टेशनच्या तिकीट काउंटर येथून मेट्रो कर्मचाऱ्याकडून याची मागणी करावी लागेल जेणेकरून मेट्रो कर्मचारी डेली पासचे व्हाउचर सुपूर्द करतील, ज्यावर डेली पास रीतसर छापलेला असेल. त्यानंतर दिवसभर अमर्याद प्रवासासाठी त्याचा वापर केल्या जाऊ शकतो.
उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रोने नुकतेच बारावी, पदवी, पदविका,आयआयटी व पॉलिटेक्निक व इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही 30 टक्के सवलतीचा निर्णय घेतला आहे. या सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांना सर्व मेट्रो भाडेमध्ये मिळत आहे.
डेली पास ही विशेषत: व्यावसायिकांना आणि व्यापाऱ्यांना फायदेशीर असेल जे विविध कारणांमुळे अथवा ज्याना अनेक वेळा बाजारात एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास करावा लागतो.
महा मेट्रो सर्व नागपूरकरांना प्रवासाच्या उद्देशाने आवाहन करते कि या नवीन ऑफरचा लाभ घ्यावा.
• * डेली पासची वैशिष्ट्ये :*
1. सर्व दिवशी अमर्यादित मेट्रो प्रवास.
2. प्रवाशी कुठ्याही स्टेशनवरून प्रवेश आणि बाहेर जाऊ शकतात.
3. त्रासमुक्त प्रवासासाठी पर्यटक दररोज ही पास खरेदी करू शकतात.
4. दैनिक पास रु 100 या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे.
5. डेली पास ही फक्त एका प्रवाशासाठी वैध असेल.
6. मेट्रो प्रवाशांनी प्रवेश – बाहेर जाण्याचा क्रम पाळावा