नागपूर : शहरात ठिकठिकाणी भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यापार्श्वभूमीवर जुना सक्करदरा विश्वशांती बौध्द विहारजवळ ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्याने कापडी पताका लावण्यात आले होते. मात्र याच दरम्यान वस्तीत घड्लेल्या एका धक्कादायक कृत्यामुळे दलित जनतेच्या भावना दुखावल्याप्रकरणी निखिलेष उर्फ सोनु दिपक गौरखेडे(३२) यांनी अमिता जैस्वाल नावाच्या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
माहितीनुसार, १६ एप्रिलला सकाळी ९ वाजता अमिता जैस्वाल महिलेने तिच्या घरासमोर दलित लोकांनी घराच्या आत प्रवेश करू नये’,अशा आशयाची पाटी लावली आहे. अमिताच्या घरासमोरील झाडावर लावलेले कापडी पताका खाली पडलेला व फाटलेला दिसला.अमितानेच हे कृत्य केले असा आरोप आहे. हा सर्व प्रकार
वस्तीतील शुभम शेंडे, रूपेष फुलझेले, शुभांगी फुलझेले, भारती धनविजय व इतर लोकांनाही पहिला. यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. परिस्थितीत हाताळण्यासाठी याठकाणी पोलिसांना पाचारण करावे लागले . फिर्यादी हा अनुसुचित जाती (एस.सी.) दलीत समाजाचा असून अमिता जैस्वाल वय अंदाजे 38 वर्ष ही कलार समाजाची (ओबीसी) आहे. पोलिसांनी या तक्रारीनुसार दलीत लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी महिलेविरोधात भारतीय दंड संहिता १९६० अंतर्गत कलम २९५ (अ), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ कलम ३ (अ)(टी )नुसार गुन्हा दाखल केला आहे.