रामटेक : रामटेक तालुक्यात दिनांक 30 नोव्हेंबर ला पहाटे 4 च्या दरम्यान रेतीची अवैध वाहतूक करणारे ४ ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडले. रेतीच्या अवैध वाहतुकीचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून महसूल विभाग सातत्याने यावर आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रामटेक महसूल विभागाने वेळोवेळी अवैध रेतीच्या कामावर ल गामही लावला आहे.
याही वेळी बालाघाट मध्यप्रदेशातून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारे यांच्यासह मंडळ अधिकारी रामटेक प्रमोद जांभुळे,मंडळ अधिकारी नगरधन कोडवते,तलाठी अमीर खान ,बांगर यांनी mh 40 Ak 0478, mh 40 BG9688, mh 40 Y 7776,mh40 BG 8800 क्रमांकाचे अवैध रेतीची वाहतूक करणारे चार ट्रॅक पकडले.यात अंदाजे 16 ब्रास रेती पकडली असून तिची किंमत 1,12,000 रुपये आहे.महसूल विभागाच्या तर्फे कारवाई अंतर्गत तलाठ्यांच्या पथकांनी अवैध वाहतूक परवाना अंतरगत सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत वाहतूक करण्याचा नियम सोडून अवैध रेतीची वाहतूक केल्याने उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे पथकाने सदर कारवाई केली .
महसूल विभागाने एकूण चार ट्रक वर मुद्देमाल सहीत एकूण 9 लाख 13 रुपयांची दंडात्मक कारवाई केली असल्याचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी सांगितले.महसूल विभागाने उपरोक्त ट्रक मालकावर दंड ठोठावला असून या कारवाईत ज्याचे 2 ट्रक आहेत असे दिनदयाल रहांगडाले , अखिल वकील अहमद, दिनेश ढोके यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ट्रक आपल्या ताब्यात घेतले असल्याचे असल्याचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी सांगितले. या कारवाई मुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
रेती माफियावर आणि रेतीची अवैध वाहतूक करणार्यांवर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचे आदेशान्वये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे व तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी सांगितले.