नागपूर : भारतीय राष्ट्रीय बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट 29 वी चॅम्पियनशिप 2023 चे भिलाई, छत्तीसगड येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सब ज्युनियर टीन्स, ज्युनियर, सीनियर आणि मास्टर अशा चार प्रकारात देशभरातील पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते.
यात नागपूरच्या शताब्दी चौक येथील मसल्स मानिया जिमचे आनंद दारव्हेकर,शक्ती पात्रे आणि जया मोरेनी सुवर्ण पदक प्राप्त करत नागपूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
दारव्हेकर यांनी दोन सुवर्ण पदक, जया मोरे हिने दोन सुवर्ण पदक तर शक्ती पात्रे याने १ सिल्वर आणि दोन सुवर्ण पदक मिळविले. या सर्व स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई -वडील , मार्गदर्शक, कोच दिलीप भंडारे आणि मित्र परिवाराला दिले आहे.