नागपूर: मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरील सफाई कामगारांना आता मार्चच्या उर्वेरीत वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. स्थानिक कंत्राटदाराकडून त्यांना तारिख पे तारिख मिळत असल्याने त्यांची मानसिकता आणखिच वाईट होत चालली आहे. आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा झाला आहे.
१६ फेब्रुवारी नंतर नागपूर रेल्वे स्थानकावरील सफाईचे कंत्राट (परमनंट व्यवस्था होईपर्यंत) स्थानिक कंत्राटदाराला देण्यात आले होते. १६ फेब्रुवारी ते १० मे पर्यंत म्हणजे पावनेतीन महिणे स्थानिक कंत्राटदाराकडे स्टेशनच्या स्वच्छतेची जबाबदारी होती. कामगारांकडून मिळालेल्या माहिती नुसार अर्ध्यापेक्षा अधिक कामगारांना मार्चचा अर्धाच पेमेंट मिळाला. एप्रिलचा पेमेंट बिल पास झाल्यानंतर मिळेल. अशातच मे महिणाही सुरू झाला. आधीच्या कंत्राटदाराकडून दिड महिण्याचे थकित वेतन काढण्यासाठी कामगारांना संघर्ष करावा लागला. आता स्थानिक कंत्राटदाराकडे तर मार्च, एप्रिल आणि मे चे १० दिवस असे दोन महिणे १० दिवसांचा पेमेंट आहे. मार्चचा पेमेंट मिळावा यासाठी आठवड्याभरापूर्वीच कामगारांनी स्थानिक कंत्राटदाराचा घेराव केला होता. लोहमार्ग पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सोमवार पर्यंत वेतन देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले होते. मात्र, सोमवार येण्यापूर्वीच स्थानिक कंत्राटदाराचे कंत्राट संपले.
त्यांच्या ठिकाणी लखनऊचे नवीन कंत्राटदार आले आहेत. शुक्रवार ११ मे पासून नवीन कंत्राटदाराने काम सुरू केले. त्यांना पुढील दोन वर्षाकरीत कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांसमोर वेतन मिळण्यावरुन मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्याच्यात असंतोष पसरला आहे. मार्चचा उर्वेरीत पेमेंट सोमवार म्हणजे १४ मे रोजी देण्याचे आश्वासन कामगारांना मिळाले होते. त्यामुळे कामगार सोमवारची प्रतीक्षा करीत होते. आज प्रत्यक्षात सोमवार आला तेव्हा कंत्राटदाराने पेमेंटच दिला नाही, तर पुन्हा दोन दिवसाची तारीख दिली. कामगारांना तारिख पे तारिख मिळत असल्याने कामगारांची मानसिकता वाईट झाली आहे.