एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण
श्री दत्ताजी मेघे यांनी स्थापन केलेल्या एनएएसी A++ मान्यताप्राप्त डीम्ड युनिव्हर्सिटी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल एमबीबीएस पदवीधरांना मदत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने ओळखून, युनिव्हर्सिटीने त्यांच्या नागपूर येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेज येथील बहुचर्चित अत्याधुनिक ग्रंथालय कोणतेही शुल्क न घेता उघडण्याचा निर्णय घेतला आहे, जे मॅरो सारख्या प्रगत लर्निंग सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. या उपक्रमाचा उद्देश त्यांना त्यांच्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे आहे.
डॉ. ललित भूषण वाघमारे- दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च चे कुलगुरू म्हणाले की, अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक सरकारी आणि गैर-सरकारी मेडिकल कॉलेज मधील आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना खाजगी ग्रंथालयांच्या सेवा घेणे किंवा महागड्या ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे.
श्री सागर मेघे – दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च चे मुख्य सल्लागार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हे ओझे अशाप्रकारे कमी होईल आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना फायदा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
डॉ. अनुप मरार – डायरेक्टर यांनी सांगितले की इच्छुक विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपूर्वी दत्ता मेघे मेडिकल कॉलेज या नाविन्यपूर्ण आणि परोपकारी डीएमआयएचईआर उपक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. मर्यादित सीट उपलब्धतेमुळे, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी, नागपूर येथे संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा.
डॉ. श्वेता पिसूळकर- दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च चे रजिस्ट्रार यांनी नमूद केले की दत्ता मेघे उच्च इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेचा हा उदात्त उपक्रम पात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि पाठबळ देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. विनामूल्य असंख्य पुस्तके, अनुकरणीय वाचनालय आणि प्रगत सॉफ्टवेअरसह संपूर्ण सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना, शिक्षणातील अंतर भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांचे समर्पण अधोरेखित करते.
अधिक माहितीसाठी, इच्छुक विद्यार्थी, कामकाजाच्या वेळेत शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर येथील डायरेक्टर-डीएमआयएचईआर ऑफ कॅम्पसच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. अपॉइंटमेंटसाठी 8459266448 या नंबरवर कु.पूजा यांना कॉल करू शकता.