Published On : Fri, Apr 6th, 2018

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसा निमित्य तिन दिवशीय शिबीर

Advertisement


कन्हान: भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसा निमित्य हनुमान नगर समाज भवन येथे दि.6 रोजी पासून तिन दिवसीय प्रधान मंत्री उज्वला गॅस नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी कन्हान चे वरिष्ट नेते मंडळी यांच्या शुभहस्ते पंडित दिनदयाल उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा प्रतिमेला माल्यार्पण करुन केक कापण्यात आले.

यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ.मनोहर पाठक यांनी पक्ष्याच्या जनसंगाचा कार्यकाळा पासून भारतीय जनता पार्टीचा वाटचालीची माहिती याप्रसंगी दिली दोन खासदारा पासून आज कार्यकर्त्याचा बळावर जनतेच्या सहकार्यने केंद्रात बहु मताने सरकार स्थापन झाली व जगात सर्वात जास्त प्राथमिक सदस्य असलेला पक्ष मनून उद्यास आला ते फ़क्त कार्यकर्त्याचा मेहनतीवरच असे सांगितले या प्रसंगी नगर सेविका लक्ष्मीताई लाडेकर, शुष्माताई चोपकर, नीतूताई गजभिये, संगीताताई खोब्रागड़े, राखीताई परते, नगर सेवक मनोज कुरडकर, अजय लोंढे यांचा नेतृत्वात प्रधान मंत्री उज्वला गॅस नोंदणी शिबिरात गॅस करीता फ्रॉम भरून देण्यात आले.

वरिष्ट नेते मनोहर ठाकुर, मूलचंद शिन्देकर, महादेव लिल्लारे, सुरेन्द्र शर्मा, कामेश्वर शर्मा, सुनील लाडेकर, स्वातीताई पाठक, वनिताताई कात्यायनी, सिमाताई वाघमारे, शिवाजी चकोले, शैलेश शेळके, मयूर माटे, आनदं शर्मा, राजेश पोटभरे, संदीप परते, विनोद खडसे, समसेर पुरवले, नरेंद्र लोंढे, रंगीता जामकर मोठ्या संख्येने कार्यक्ते शिबिरात उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement