नांदेड : नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. मात्र, त्यापाठोपाठ आता त्याच रुग्णालयात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत आणखी ७ रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे.
मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात ३० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते १ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या दीड ते तीन दिवसाच्या नवजात बालकांचा समावेश आहे. यासोबतच सर्प दंश, विष प्राशन आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. यात भर होऊन आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यात चार नवजात बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे.